top of page

Promote Your brand Contact - 8421378090

www.theaktalk.com

भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीचा मुद्दा तापला; ३२ हजारांहून अधिक झाडांच्या परवानगीवरून वाद

tep0elzhr7jg1.jpeg

Pune and Maharashtra’s premier digital news and media

1719987185-3852.webp
DSC09765 without logo.jpg
AA278ak4.jpg

29 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत बुधाचे संक्रमण, 3 राशींसाठी शुभ काळ असेल

Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!

पिठातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; राज्यभर होणार तपासणी!

लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार

tree-clearing-5901227_1280.jpg

पिठातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; राज्यभर होणार तपासणी!

news logo.jpg
Caari All-Day Cocktails in Aundh.png
IMG_7432.JPG
www.theaktalk.com
news logo.jpg
Caari All-Day Cocktails in Aundh.png
The AK Talk News Promotion Banner.png

Pune Latest News

Stay informed with our curated feed of the most recent articles and news stories from Pune and Maharashtra.

HWH1Kvoa0AAC0Is.webp
20261031_LDP004.jpg

पुणे मेट्रोला मिळणार नवी गती! पंतप्रधान मोदी आज मेट्रो मार्गिका ३ चे ऑनलाइन उद्घाटन करणार!

पुणे : पुणेकरांची बहुप्रतीक्षित असलेली पुणे मेट्रोची तिसरी मार्गिका अर्थात माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (३ नोव्हेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता माळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या नव्या मेट्रो मार्गावरील प्रवासी सेवा ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून अधिकृतपणे सुरू होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो लाईन-३ हा २३.२०३ किलोमीटर लांबीचा पूर्णपणे उन्नत (Elevated) मेट्रो मार्ग आहे. या मार्गाला ‘पुणेरी मेट्रो’ तसेच ‘पिंक लाईन’ म्हणूनही ओळखले जाते.

माण येथून सुरू होणारा हा मेट्रो मार्ग हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून पुढे जात शिवाजीनगरला जोडला जाणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून, पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्यास मदत होणार आहे.

पुणे मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या लाईन-३ प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. यामध्ये भूसंपादन आणि विविध सेवा-सुविधांचे स्थलांतर (Utility Shifting) यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७’ अंतर्गत हा प्रकल्प DBFOT (Design, Build, Finance, Operate and Transfer) या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात आला आहे.

या मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके असून, त्यापैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. यातील सात स्थानकांवर सुरुवातीला केवळ एक जिना कार्यान्वित असेल.

मेट्रोतून उतरल्यावर प्रवाशांना पुढील प्रवास सहज करता यावा, यासाठी विविध वाहतूक साधनांचे एकत्रीकरण (Multi-Modal Integration) करण्यात येत आहे.
तसेच रस्त्यावरील वाहतुकीसोबतच पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक, रुंद पदपथ, पादचारी क्रॉसिंग आणि पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. यामुळे विशेषतः हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी ८,३१३ कोटींचा खर्च; १०० महिला ट्रेन पायलट चालवणार मेट्रो!

harshada-deshmukh.avif

​

पुणे पदवीधर निवडणुकीचा निकाल का रखडला? हर्षदा देशमुख की स्मिता जाधव, बाजी कोण मारणार? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!

सौरऊर्जेवर धावणार मेट्रोला मिळणारी ऊर्जा!

या प्रकल्पांतर्गत एकूण ७.६० मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती व्यवस्था उभारण्यात आली आहे. यापैकी ६.१० मेगावॅट क्षमता मेट्रो स्थानकांवर, तर १.५० मेगावॅट क्षमता मेट्रो कार डेपोमध्ये उभारण्यात आली आहे. या हरित ऊर्जेमुळे प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी जवळपास ३० टक्के गरज पूर्ण होणार आहे.


या प्रकल्पाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुणे मेट्रो लाईन-३ वरील सर्व मेट्रो गाड्या सुमारे १०० महिला ट्रेन पायलट्स चालवणार आहेत.

याशिवाय स्टेशन कंट्रोलर, तिकीट विभागातील कर्मचारी आणि स्टेशन अटेंडंट यांसह एकूण स्थानक कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के कर्मचारी महिला असणार आहेत.

महिलांचे सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पुणे मेट्रो लाईन-३ ठरणार विकास, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श!

The AK Talk News | पुणे

पुणे मेट्रोची धुरा १०० महिला ट्रेन पायलट्सच्या हाती!

पुणे: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी काल सकाळपासून मतमोजणी सुरू असून ३० तास उटल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून अद्याप एकाही उमेदवाराच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पाच जागांपैकी पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील, अमरावती शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण सरनाईक तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांचा तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र असं असलं तरी अधिकृत निकालास विलंब का होत आहे, याबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून त्याची विविध कारणे समोर येत आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली असून, विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार हर्षदा देशमुख यांनी १ लाख ११ हजार ४२५ मते मिळवली असून स्मिता जाधव यांनी १ लाख ०२ हजार ५५४ मते मिळवली आहे.

IMG_7432.JPG
pune-teachers-constituency-mlc-election-result-bjp-won-after-18-years-congress-out-of-race

पुणे शिक्षक मतदारसंघात 'गोकुळ इफेक्ट' फुस्स; शिवसेनेची बंडखोरी पथ्यावर, 18 वर्षांनी भाजपने कसं केलं कमबॅक?

पिठातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; राज्यभर होणार तपासणी!

Tukaram Mundhe: राज्यात उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू असताना, भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय फार काळ टिकणार नाहीत, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

​

तेल, मसाले, दूध, तूप, पनीर आणि गुळानंतर आता पोळी, भाकरीसह विविध पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिठाची राज्यभर तपासणी केली जाणार आहे. मुदत संपलेले पीठ पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचे तपासणीत समोर आले आहे. विशेषतः सणांच्या काळात अशा प्रकारे पीठ विकले जात असल्याची माहिती मिळाल्याने तपासणीच्या सूचना दिल्या आहेत,’ अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त  यांनी दिली.

​

‘दी पूना मर्चेंट्स चेंबर’च्या लाडू-चिवडा विक्री केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मुंढे यांनी ही माहिती दिली. ‘राज्यात गेल्या काही महिन्यांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे. विविध पदार्थांमध्ये भेसळ आढळून येत असतानाच आता पॅकिंग करून विक्री होत असलेल्या पिठामध्ये भेसळ होत आहे; तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य पिठाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल आणि मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी एक हजारांहून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे २८ हजार क्विंटल खाद्यतेल आणि १८ ते २० हजार क्विंटल मसाले जप्त करण्यात आहे,’ असेही मुंढे म्हणाले.

'व्यापाऱ्यांना त्रास देणे हा अन्न व औषध प्रशासनाचा(एफडीए) उद्देश नाही. मात्र, भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 'एफडीए'चे अधिकारी विनाकारण त्रास देत असतील किंवा पैशांची मागणी करीत असतील, तर व्यापाऱ्यांनी पुराव्यासह तक्रार करावी. संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. मात्र, केवळ तपासणी केली म्हणून तक्रार करू नये.

अन्नसुरक्षेचे नियम पाळावे
भेसळयुक्त किंवा दूषित अन्नपदार्थांमुळे विषबाधा, आजारपण आणि काही वेळा मृत्यूचाही धोका असतो. समाजातील सर्वच स्तरातील ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. ग्राहकांच्या आरोग्याला अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी केले. दिवाळीनिमित्त विक्री होणाऱ्या फराळाच्या पदार्थांची आगामी काळात तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. राज्याची लोकसंख्या पाहता ‘एफडीए’कडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांनीही अन्न भेसळीविरोधात पुढाकार घेऊन तक्रारी कराव्यात. तक्रारीत तथ्य आढळल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली असून, बहुरंगी लढतीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारून विधान परिषदेवर प्रवेश केला. त्यांच्या विजयामुळे तब्बल १८ वर्षांनंतर या मतदारसंघावर भाजपला पुन्हा झेंडा फडकविण्यात यश आले. गोकुळ दूधसंघातील यशाचा काँग्रेसला फायदा होण्याची चर्चा असतानाच, ते मात्र विद्यमान आमदार असूनही चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.

या निकालाने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच, महायुतीतील बंडखोरी आणि काँग्रेसच्या घसरलेल्या मतसंख्येने राजकीय समीकरणांना धक्का दिला आहे. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी दुसरे स्थान मिळवले, तर माजी आमदार दत्तात्रय सावंत तिसऱ्या आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या स्थानावर फेकले गेले.

Heading 6

पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल

शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा लढा, सहकाऱ्यांचा विश्वास आणि मतपेटीतून व्यक्त झालेला कौल... या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. गावडे यांना २३ हजार ११७ मते मिळाली, तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना १६ हजार ३४७ मतांवर समाधान मानावे लागले.

माजी आमदार दत्तात्रय सावंत १२ हजार ६८७ मतांसह तिसऱ्या, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर ८ हजार ९६५ मतांसह चौथ्या स्थानी राहिले. पसंतिक्रमानुसार झालेल्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला २५ हजार ७५६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांच्या हस्तांतरणानंतर गावडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

या मतदारसंघात २००८ मध्ये भाजपसमर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे भगवानराव साळुंखे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये अपक्ष दत्तात्रय सावंत, तर २०२० मध्ये काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर यांनी बाजी मारली. आता गावडे यांच्या विजयाने भाजपने १८ वर्षांनंतर या मतदारसंघात पुनरागमन केले आहे.

AA278ak4.jpg
1757053716-photo-pune.avif

लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार! तारीख आणि तिकीट दर समोर

आधी अपघात आणि नंतर खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेल्या पुण्यातील (Pune) लोहगड हत्याप्रकरणात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सियासह तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटकही केली असून तब्बल 5,053 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये तपासातील सर्व माहिती आणि घटनेच्या आधी व नंतर केलेल्या डिजिटल सर्चची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम (Ujjwal nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. 

लोहगड येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केतनच्या वडिलांनी दिली. त्यामुळे या खटल्याच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि खटल्याची प्रभावीपणे बाजू मांडली जावी, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रकरणाला कायदेशीर स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त करत आणि आपल्या मुलाला न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्याचे सांगत अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, केतनच्या गूढमय हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. त्यानुसार, आता निकम यांची नियुक्ती झाली आहे. 

Pune Hinjewadi-Shivajinagar Metro: हिंजवडी मेट्रो चार नोव्हेंबरपासून सुरू होणार असली, तरी सुरुवातीचे काही दिवस मेट्रोच्या सध्याच्या दोन मार्गिकांवरील प्रवाशांना जिल्हा न्यायालयापासून हिंजवडी मार्गिकेसाठी स्वतंत्र तिकीट काढावे लागणार आहे.

शहरातील बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नोव्हेंबरला सकाळी झाल्यावर प्रवाशांसाठी ही मेट्रोसेवा बुधवारी (४ नोव्हेंबर) सकाळी सहापासून सुरू होणार आहे. या मेट्रोतून जिल्हा न्यायालय ते हिंजवडी फेज ३ (मेगापोलिस सर्कल) पर्यंत प्रवास करण्यासाठी ६२ रुपये मोजावे लागणार आहेत. गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी; तर कमी गर्दीच्या वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रोसेवा उपलब्ध असेल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी मेट्रो उद्घाटनाविषयी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बालेवाडी येथे उपस्थित राहणार आहेत. ‘पहिल्या टप्प्यात मेट्रोची १७ स्थानके सुरू होणार असून, उर्वरित सहा स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होतील,’ असे त्यांनी सांगितले.

‘हिंजवडी मेट्रोसाठी २२ ट्रेनचे संच उपलब्ध असून, ही पिंक लाइन किंवा पुणेरी मेट्रो म्हणून ओळखली जाणार आहे. या शहरातील इतर दोन मेट्रो मार्गिकांप्रमाणे सकाळी सहापासून मेट्रोसेवा सुरू होतील. रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी जिल्हा न्यायालय येथून शेवटची ट्रेन हिंजवडीच्या दिशेने येईल,’ अशी माहिती अभिजित चौधरी यांनी दिली. ‘केंद्र सरकारच्या मेट्रो धोरण २०१७ अंतर्गत मंजूर झालेला हा पहिला प्रकल्प असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) स्वरूपात हा प्रकल्प असल्याने इतर मेट्रो प्रकल्पांपेक्षा या मेट्रोचे तिकीट दर अधिक आहेत,’ याची कबुली चौधरी यांनी दिली.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) मोबाइल ॲपमध्ये त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व तिन्ही मार्गिकांवरील प्रवाशांना एकाच तिकिटात प्रवास करता यावा, यासाठीचे प्रयत्न सुरू असून, पुढील काही दिवसांत त्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या नागरिकांना तिकीट खिडकीसह क्यूआर कोड किंवा व्हॉट्सअपद्वारे तिकीट काढता येणार आहे. व्हॉट्सॲपवर तिकीट उपलब्ध होणार असलाने प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.

मेट्रोच्या गर्दीच्या वेळा वेगळ्या ?
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा गर्दीच्या वेळेत सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत दर सहा मिनिटांना प्रवाशांना मिळणार आहे; तर उर्वरित वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मात्र, 'महामेट्रो' आणि पुणेरी मेट्रोच्या गर्दीच्या वेळांमध्ये फरक आहे. 'महामेट्रो'च्या दोन मार्गिकांवर गर्दीच्या वेळा (सकाळी ८ ते ११ व सायं. ४ ते ८) वेगळ्या आहेत. त्यामुळे शहरातील तिन्ही मेट्रो मार्गिकांवर गर्दीच्या वेळा एकच राहाव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

संपूर्ण प्रवासासाठी ४५ मिनिटे
हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान पहिल्या ते अखेरच्या स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी ४५ मिनिटे लागतील, असा अंदाज आहे. सुरुवातीला १७ स्थानके खुली होणार असल्याने कदाचित ही वेळ कमी होऊ शकते; पण सर्व स्थानके सुरू झाल्यानंतर या प्रवासाकरिता अधिकचा वेळ लागू शकतो. मात्र, सध्या हिंजवडीला जाण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तास लागतात. या तुलनेत अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

अनेकदा मुदतवाढ
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच नोव्हेंबर २०१८ मध्ये झाले होते. त्यानंतर हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. करोनामुळे त्याला मुदतवाढ मिळाली, तरीही मार्च २०२५ पर्यंतची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, किमान सहा ते आठ मुदतवाढीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि त्या सर्व तारखा उलटून गेल्यानंतर मोदी यांच्याच हस्ते जवळपास नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हिंजवडी मेट्रो अखेर खुली केली जाणार आहे. बहुसंख्य मेट्रो प्रकल्प उद्घाटनाच्या दिवशीच व्हीआयपींचा ताफा गेल्यानंतर दोन ते तीन तासांत प्रवाशांसाठी खुले होतात. मात्र, हिंजवडी मेट्रोने यातही वेगळेपणा जपला असून, तीन नोव्हेंबरला फक्त उद्घाटन आणि चार नोव्हेंबरपासून सेवा असा नवा पायंडा पाडला आहे.

तिकीट दर असे आहेत...
 

  • ०-२ किमी १२ रुपये

  • २-४ किमी २५ रुपये

  • ४-८ किमी ३७ रुपये

  • ८-१२ किमी ४५ रुपये

  • १२-१८ किमी ४९ रुपये

  • १८ किमीच्या पुढे ४५ रुपये

DSC09765 without logo.jpg

Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पुन्हा एकदा वाघानं हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Andhari Tiger Reserve) बफर क्षेत्रातील पळसगाव वनपरिक्षेत्रात (Palasgaon forest range) वाघाच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात उषा अंकुश गुरुनुले (वय 45) यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. 16) पतीच्या डोळ्यादेखत ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी वाढत्या वाघांच्या हल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे जंगलालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Chandrapur Tiger Attack) 

Chandrapur Tiger Attack: दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला; मानेचा चावा घेतल्याने घटनास्थळीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, उषा अंकुश गुरुनुले (वय 45) या आपल्या पती अंकुश यांच्यासोबत धान पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेल्या होत्या. पती डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था करीत असताना उषा शेतातील तण काढत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर आरडाओरड झाल्याने वाघाने त्यांना पकडून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. दरम्यान, पतीने आरडाओरड करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघाने मानेचा चावा घेतल्याने उषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पळसगाव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 559, पीएफ 1000 परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Tiger Attack: जंगलालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी साठ वर्षीय महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेला वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आगरझरी तलाव परिसरातून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आगरझरी तलाव परिसरात मंदाबाई मंगाम या 60 वर्षीय शेतकरी महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या महिलेवर हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मंदाबाई मंगाम यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाची वाहने अडवून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वनविभागाच्या QRT पथकाने यावर कारवाई करत या भागातून वाघाला जेरबंद केलं. सध्या या वाघाला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे. अशातच आता चंद्रपूर परिसरात पुन्हा एकदा वाघानं हल्ला केल्याची घटना घडली असून या वाघांच्या हल्ल्याचा बंदोबस्त करणे वनविभागापुढचं आव्हन असणार आहे. तर नागरिकांनीही जंगललगतच्या शेतात काम करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

news logo.jpg

Maharashtra Latest
News

Maharashtra’s Voice, Your Brand’s Reach.png

Stay informed with our curated feed of the most recent articles and news stories from Pune and Maharashtra.

news logo.jpg
Caari All-Day Cocktails in Aundh.png
IMG_7477.jpg

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा, पर्यटनाचा आणि आर्थिक विकासाचा मोठा उत्सव ठरणार आहे. पुढील २२ महिन्यांत गोदावरीच्या तीरावर भक्ती, अध्यात्म आणि परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे.

 

आगामी काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रण, पार्किंग, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन ही प्रशासनासाठी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.

नाशिक पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी विविध शासकीय विभागांकडून तयारी सुरू आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज भव्य धार्मिक सोहळ्याने शुभारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा तब्बल २२ महिने चालणार असून २४ जुलै २०२८ रोजी ध्वज उतरवून या पर्वाची सांगता होणार आहे. नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे एकाच वेळी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वजारोहण करण्यात आले.

naresh-maske.webp

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, संत-महंत आणि विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. सायंकाळी रामकुंड येथे ६,५०० आदिवासी बांधवांच्या सहभागातून महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ वर्षांनंतर नाशिकमध्ये सिंहस्थ पर्व


नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गुरु ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश हा या सिंहस्थ पर्वाचा महत्त्वाचा ज्योतिषशास्त्रीय आधार मानला जातो. गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक, साधू-संत आणि विविध आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे.
navbharatlive_2026-10-29_3a1fm2bh_CM-Fadnavis-Uddhav-And-Raj-Thackeray.avif

आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी! केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार; नरेश म्हस्के आक्रमक, पूर्णेकर प्रकरणावरून राजकीय संघर्ष पेटला

प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन ठाण्यातील वातावरण तापलं आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरुन ठाण्यातील वातावरण तापलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जावून खासदार नरेश म्हस्के यांच्यावरही टीका केली. यानंतर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अटक करा, असं नरेश म्हस्के म्हणाले. "आदित्य ठाकरे यांचं स्वत: दिशा सालियन प्रकरणात आरोपी म्हणून नाव आहे. दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना अटक करा म्हणून मागणी करत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही त्यांचं नाव संशयित म्हणून चर्चा आहे", असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.

"आमच्या ठाण्यातील मनसूख हिरेन यांची हत्या झाली. आदित्य ठाकरे यांना त्यावेळी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला वेळ मिळाला नाही. दिशा सालियन प्रकरणात त्यांचं नाव आरोपी म्हणून आहे. तुम्ही स्वत:हून अटक का होत नाहीत?", असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.

फडणवीस, राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर! कार्यक्रमापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा?

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड मुंबईत बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या घडामोडी मुंबईत घडताना बघायला मिळाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले आहेत. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या 'महाराष्ट्राची हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात तीनही नेते मुंबईत एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे तीनही नेत्यांमध्ये कार्यक्रमापूर्वी बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
 

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत शेलारांना टोला

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मंत्री आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा दाखला देत मिश्किल टोला लगावला. "सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना बोलावलं की मुख्यमंत्री येतात. याच्यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलावत जाईन आणि ते येत जातील, असं त्यांचं म्हणणं आहे. 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. आता काय सांगू मी", असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

"आम्ही शिवसेना म्हणून जाहीर करतो. लवकरात लवकर आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात अटक झाली पाहिजे. वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटणार. वेळ पडली तर आदित्य ठाकरे यांना अटक करा या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढणार. वाईट वाटतं की, एखाद्या मृत व्यक्तीच्या नावावर विरोधी पक्षाचं राजकारण सुरु आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. त्यांचा निषेध आज ठाणेकरांनी केलेला आहे. आदित्य ठाकरे यांना अटक करा यासाठी सीबीआयकडे मागणी करतोय", असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला.
 

आदित्य ठाकरे यांची ठाण्यात पत्रकार परिषद

"खासदार नरेश म्हस्के हे शिवराळ भाषा वापरत आहेत. पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मास्टरमाईंडला वाचवायला एवढे उत्सुक का आहेत? राम पूर्णेकरांना ताब्यात घेण्यास सांगितलं. फेकनाथमध्ये हिंमत असती तर पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली असती, मास्टरमाईंडला अटक कधी होणार, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राम पूर्णेकर भेटायला गेले तर त्यांना अटक करायला सांगितलं, आमची ताकद दिसली म्हणून मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा आला आहे", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आज ठाण्यामध्ये पोहचत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

कार्टुन आल्यावर चिडून अटक न करता ती गोष्ट कशी घेतो ते महत्त्वाचं : उद्धव ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषण केलं. "ब्रिटनचे पंतप्रधान लॉयड जॉर्ज होते. त्यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर एका मुलाखतकाराने विचारलं की, तुम्ही पंतप्रधान असताना पदाचा ताण कसा सहन करायचे? काय करायचात तुम्ही? तेवढं सहन करुनही तुम्ही एवढे हसतमुख कसे असायचे? ते बोलले, मी काही करत नाही. मला सकाळी जाग आल्यानंतर अंथरुनातून बाहेर पडण्याआधी डेली एक्सप्रेस हे वृत्तपत्र बघतो. वृत्तपत्रांच्या धोरणांशी मी सहमत नसायचो. पण त्यातील स्ट्रूपने काढलेले कार्टुन आवर्जुन पाहायचे आणि माझा दिवस आनंदात जायचा.कारण स्ट्रुप यांनी माझ्यावर हसायला शिकवलं. स्वत:वर हसायला शिकणं आणि ते तसं घेणं कारण कार्टुन आल्यावर चिडून ते बंद करणं, पेपर बंद करुन टाक, त्याला अटक न करता तुम्ही ती कशी घेता हे महत्त्वाचं आहे. हा गुण आपण सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे सेनेची आहे. जवळपास एक महिना उलटला तरीही पूर्णकरांच्या हत्येप्रकरणी ठोस तपास नाही आणि मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर काही दबाव आहे का, असा सवाल ठाकरे सनेकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस ठाणे धगधगतंय.
 

आदित्य ठाकरे आणि राऊतांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

दरम्यान, आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी ठोस तपास का होत नाही, काही दबाव आहे, का अशी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...

दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणानंतर ठाण्यामध्ये विरोधकांनी एकी केली आहे. मनसेनेही ठाकरेसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण आजमात्र टेंभीनाका परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यापूर्वी माजी खासदार राजन विचारे यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काहीच कसं बोलत नाहीत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊतांनी म्हटलं की, राज्याला मिळालेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत.

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि नरेश म्हस्के यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांबाबत तुमचे काय मत आहे? कृपया तुमची मते कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

सातारा: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी काल शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट टाळल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र या बाबतच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची आज डॉ.स्मिता जाधव यांनी भेट घेतली आहे. शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्ट केले आहे. संभ्रम दूर झाल्याशिवाय आमच्याकडून पाठिंबा नसल्याचे देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. वरिष्ठांकडून सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचा मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महायुतीमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Shambhuraj Desai) 

Shambhuraj Desai : त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली..

तर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले,"काल काय त्यांनी माझ्या कार्यालयाकडे संपर्क केला नव्हता.नंतर   काल संपर्क माझ्याकडे त्यांचा झाला आणि त्यांनी मला भेटीची वेळ मागितली. मी 10 वाजता फलटण, कोरेगाव, कराडच्या या दौरेवरती निघालेलो आहे. मी कालच त्यांना सांगितलं, 10 वाजता मी बाहेर पडणार आहे, त्याच्या अगोदर येऊ शकतात. त्यामुळे त्या प्रमाणे महायुतीच्या उमेदवार भाजप पक्षाच्या स्मिताताई जाधव आज आलेल्या होत्या. त्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितलं, आम्ही महायुतीमध्येच आहोत. परंतु काही बाबी जिल्ह्यामध्ये यापूर्वी थोड्याशा घडलेल्या आहेत. आम्ही नेते म्हणून नाही, परंतु खाली कार्यकर्त्यांच्या मध्ये त्याच्याबद्दलची पुढची नाराजी आहे. वरिष्ठ पातळीवर एकदा त्या गोष्टी एकदा क्लियर झाल्या की अडचण कुठली येणार नाही, पण त्या गोष्टी क्लियर व्हाव्यात लवकर, अशा पद्धतीची चर्चा आमची झाली, त्या म्हटलेल्या आहेत. मी वरती आमच्या नेतेमंडळींच्या अशी चर्चा करते आणि मग त्यात पण त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला की, आम्ही महायुतीमधूनच निवडणूक लढवत आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही सांगितलेलंच आहे, महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. परंतु खाली कार्यकर्त्यांच्या मध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या मध्ये संभ्रम थोडासा निर्माण झालेला आहे, तो दूर करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकदा का या काही गोष्टी क्लियर झाल्या की, ही निश्चितपणे दुरी दूर होईल. आणि त्या जर दूर झाल्या लवकर, तर नक्कीच एक शिवसेनेचा मोठा मेळावा घेऊन, त्याच्यामध्ये मग शिवसेनेचा पाठिंबा सुद्धा या ठिकाणी आम्ही त्याला जाहीर करू. तत्पूर्वी या ज्या गोष्टी पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आणि शंका आहेत, त्या थोड्याशा बाजूला होणं गरजेचं आहे."  

पुणे शिक्षकबाबात बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, "झालाय निर्णय आमचा. पुरस्कृत आहेत ते, नुसता पाठिंबा नाही. प्राध्यापक सचिन सनप हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत. मी त्यांच्या प्रचाराला काल सांगलीमध्ये जाऊन आलो, आता फलटणला चाललोय, संध्याकाळी कराडचा कार्यक्रम आहे, उद्या पाटणचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर परवा जावळी मेळाव्याचा कार्यक्रम आहे. आम्ही उघडपणानं सगळे शिवसैनिक, हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत, प्राध्यापक सचिन सावंत, सचिन सनपांच्या प्रचारासाठी आम्ही सगळे शिवसेना सक्रिय आहोत." 

news logo.jpg
Eknath-Shinde-PNG-2048x2048.png
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde: दिवाळीचा शिधा हा दसऱ्याच्या दिवशी रवाना होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाला शिंदे यांनी भेट दिली. शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच महाप्रसाद वाटप देखील करण्यात आलं. यावेळी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनादेश स्वरूपात मदत सुपूर्द केली. 

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही

एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही दिलेला शब्द पाळणार असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रावर मोठं दुष्काळाचं संकट असल्याचं भान ठेवून यंदा रास-दांडिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने, धार्मिक आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. सरकारसोबत नवरात्रोत्सव मंडळांचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन केलं.

पाच हजार अग्रीम देण्याचा निर्णय जाहीर केला 

तत्पूर्वी, पुण्यात बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकरी यावर्षी अडचणीत आहे. शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही गेलो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि दुष्काळ जाहीर केला. दुष्काळामध्ये ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही हे आम्ही सांगितलं होतं. पाच हजार अग्रीम देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी मिळेल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे, मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आश्वस्त केलं आहे. केंद्राची देखील मोठी मदत शेतकऱ्यांना मिळेल.  शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आमच्या सरकार करेल.

Caari All-Day Cocktails in Aundh.png
Urban Bistro Aundh Gold Café Banner.png

 ताज्या क्राईम न्यूज

news logo.jpg
मुंबई उच्च न्यायालयाकडून डबल मर्डर मधे माऊली उर्फ केतन कोलते यांना जामीन मंजूर
पत्नीच्या हत्या प्रकरणात आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : मुंबई उच्च न्यायालयाने खून, खुनाचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) यांसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या माऊली उर्फ केतन रामदास कोलते यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मा. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या न्यायालयाने हा आदेश पारित केला. सदर प्रकरण लोणीकंद पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २०/२०२२ शी संबंधित आहे. या प्रकरणात अर्जदाराला दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. अर्जदाराच्या वतीने ॲड. सत्यव्रत जोशी व ॲड. इशान पराडकर यांनी युक्तिवाद केला आणि ॲड. यश फडतरे यांनी सहाय्य केले. राज्य सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. सुकांत ए. करमरकर यांनी बाजू मांडली. अर्जदाराने सुमारे चार वर्षांहून अधिक काळ कारावासात व्यतीत केला असून, आरोप निश्चित होऊनही खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झाली नव्हती. या प्रकरणातील एकूण २४ आरोपींपैकी १८ सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झालेला होता. तसेच, अर्जदाराची कथित भूमिका इतर सहआरोपींच्या भूमिकेसारखीच असल्याचे आणि या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखालाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. सत्यव्रत जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने खटल्याची सुनावणी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेले असतानाही, प्रत्यक्षात खटल्याची सुनावणी पुढे सरकत नव्हती. त्यामुळे आरोपीला दीर्घकाळ कारागृहात राहावे लागत असून, खटल्याच्या कार्यवाहीतील विलंबाचा मुद्दा ॲड. जोशी यांनी प्रभावीपणे मांडला. दीर्घकाळ कारावास, खटल्याच्या सुनावणीस होणारा विलंब आणि सहआरोपींना मिळालेला जामीन या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने अर्जदाराचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाने अर्जदारास रुपये ५०,००० च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या एक किंवा दोन जामीनदारांच्या अटीवर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई, प्रतिनिधी : पत्नीच्या हत्या प्रकरणात चार वर्षे चार महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या दीपक पांडुरंग धवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात आरोपीचा दीर्घकालीन कारावास आणि खटला पूर्ण होण्यास लागणारा संभाव्य विलंब या बाबींचा विचार केला.
सदर प्रकरणात आरोपीवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून, ही घटना ७ जून २०२२ रोजी शिरूर न्यायालयाच्या परिसरात घडल्याचा अभियोजन पक्षाचा आरोप आहे. पत्नीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाही सुरू असताना आरोपीने तिच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला, तर सासू-सासरेही जखमी झाल्याचे अभियोजन पक्षाच्या कथनात नमूद आहे.
आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सत्यव्रत जोशी आणि अ‍ॅड. इंद्रायणी पंडित यांनी युक्तिवाद करताना, तो चार वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असूनही खटल्यात प्रत्यक्ष प्रगती झालेली नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आरोप निश्चित झाल्यानंतर अनेक तारखांना पुराव्यांसाठी प्रकरण पुढे ढकलण्यात आल्याचेही न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले. 
न्यायालयाने आपल्या आदेशात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत असलेल्या जलद खटल्याच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित केले. खटला निकट भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे आणि आरोपीने मोठा कालावधी कारावासात व्यतीत केल्याचे विचारात घेऊन जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाकडून खून प्रकरणातील आरोपी केशव मोतीराम आसोरे ला जामीन मंजूर


पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपी क्रमांक २ केशव मोतीराम आसोरे यास जामीन मंजूर केला आहे. मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या न्यायालयात दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सदर जामीन अर्जावर सुनावणी झाली.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात अर्जदारास आरोपी क्रमांक २ म्हणून दाखल करण्यात आले होते.

अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. सत्यव्रत जोशी, अॅड. सचिन झालटे-पाटील, अॅड. इशान पारडकर आणि अॅड. सुमित सातव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रथम माहिती अहवालात अर्जदाराचे नाव नमूद नव्हते. तसेच, कथित घटनेतील दुसऱ्या आरोपीची ओळख पटविण्यासाठी तब्बल सहा महिन्यांनंतर आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ओळख परेड घेण्यात आली होती. अर्जदाराची कथित भूमिका, ओळख परेड घेण्यास झालेला विलंब तसेच खटल्याची सुनावणी दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने अर्जदाराला जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.

अर्जदार गेल्या एक वर्ष सहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, खटल्याची सुनावणी सुरू असतानाही ती रखडल्याची बाब न्यायालयाने विचारात घेतली. अर्जदाराची कथित भूमिका आणि खटल्याचा लवकर निकाल न लागण्याची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

IMG_7432.JPG
Urban Bistro Aundh Gold Café Banner.png

Business News

Mustard Bottle
Chai Bottle

Stay informed with our curated feed of the most recent articles and news stories from Pune and Maharashtra.

news logo.jpg
kotkar_201812167008.jpg
3d-rendering-glass-wall-of-a-bank-building-against-sky-background-photo.jpg

हेलिकॉप्टर खरेदीमुळे चर्चेत, हॉटेल व्यवसायात प्रसिद्ध, संदीप कोतकर उद्योग समूहावर IT विभागाचा छापा; पुणे-अहिल्यानगरमध्ये खळबळ

गृह कर्ज महागले! सरकारी बँकांनी व्याजदरात केली वाढ, Repo Rate वाढीनंतर बँकांचा नवा निर्णय

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात आज गुरुवारी मोठी खळबळ उडाली. शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संदीप उद्योग समूहाशी संबंधित विविध ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील पथकाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. काल बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत हॉटेल संदीप, हॉटेल सचिन, केडगाव येथील कोतकर यांचे निवासस्थान तसेच पुण्यातील काही व्यावसायिक ठिकाणांची तपासणी करण्यात येत असल्याचं समजतं. संबंधित कुटुंबाशी निगडित एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानीही पथकाने तपासणी केल्याची माहिती आहे. एकाचवेळी विविध ठिकाणी सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्राचं लक्ष या घडामोडीकडे लागलं आहे.
 

भल्यापहाटेच पथकाची कारवाई

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे येथील पथकाने काल बुधवारी सकाळी सातच्या सुमारास विविध ठिकाणी एकाचवेळी तपासणी सुरू केली. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील हॉटेल्स, शहरातील व्यावसायिक आस्थापने आणि केडगाव परिसरातील निवासस्थानाचा त्यामध्ये समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेल संदीप आणि हॉटेल सचिन या संदीप उद्योग समूहाशी संबंधित आस्थापनांसह पुण्यातील हॉटेल्समध्येही तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याचं समजतं. मात्र, तपासणीचा नेमका आवाका किती आहे? कोणत्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे? आणि या कारवाईतून काय निष्पन्न होणार? याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

Bank Interest Rate Hike : देशातील 6 प्रमुख सरकारी बँकांनी त्यांच्या संदर्भदरात वाढ केली आहे. या वाढीचा परिणाम संबंधित बँक ग्राहकांच्या गृहकर्ज तसेच इतर प्रकारच्या कर्जांवर होऊ शकतो. बँकेचे संदर्भदर वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढू शकतात. मुळात कोणकोणत्या बँकांनी संदर्भदरात वाढ केली? तसेच याचा ग्राहकांवर होणारा परिणाम काय? जाणून घ्या.

नुकतेच भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेट मध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. एकंदरीत आधी 5.25 टक्के दर असलेला रेपो रेट आता 0.25 टक्क्यांनी वधारून 5.50 टक्के इतका झाला आहे. जेव्हा एखाद्या देशाची मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करते तेव्हा देशातील इतर बँकांच्या व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता असते. दरम्यान RBI Repo Rate वाढीनंतर देशातील सहा प्रमुख बँकांनी त्यांच्या कर्जाच्या संदर्भदरात वाढ केली आहे.
 

सरकारी बँकांचे संदर्भदर वाढले

भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या सहा बँकांनी कर्ज संदर्भ दरात वाढ केली आहे. व्याजदरातील या बदलामुळे संबंधित बँक ग्राहकांच्या गृहकर्जावर परिणाम जाणवू शकतो. भारतीय स्टेट बँकेने EBLR दरात 0.25 टक्क्यांची वाढ केली असून नवे दर 8.15 टक्के आहे. तर RLLR दरातही सारखीच वाढ केली असून नवे दर 7.75 टक्के इतके आहे. मुख्य बाब म्हणजे एखाद्या बँकेचे EBLR दर बाह्य संदर्भदराशी जोडलेले असतात. तर RLLR दर रेपो दराशी जोडलेला कर्जदर असतो. पंजाब नॅशनल बँकेने RLLR दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली असून नवे दर 8.35 टक्के इतके आहे. तर बँक ऑफ इंडियाचे नवे RLLR कर्जदर 8.35% इतकेच आहे. कॅनरा बँकेने RLLR दरात वाढ करून नवे दर 8.25% इतके जाहीर केले आहे.

IMG_7432.JPG

बँक ऑफ बडोदा या बँकिंग संस्थेने BRLLR या कर्जदरात वाढ केली असून नवे दर 8.15 टक्के इतके आहेत. मुळात BRLLR म्हणजे किरकोळ कर्जांसाठीचा संदर्भदर. इंडियन बँकेने RBLR दरात 25 बसेस पॉईंटची वाढ केली असून नवे दर 8.20 टक्के इतके आहे. RBLR म्हणजे रेपो आधारित कर्जदर.
 

बँकांचे संदर्भदर आणि गृहकर्ज दर वेगळे असतात

एखाद्या बँकेचा संदर्भदर आणि गृह कर्जदर वेगळा असू शकतो. मुळात बँक संदर्भदराचा वापर कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी करते. एखाद्या ग्राहकाला कर्ज देताना बँक संदर्भदर, ग्राहकाची पात्रता, कर्ज घेण्याचे प्रकार तसेच इतर अटी तपासून योग्य व्याजदराचा निर्णय घेते. विशेष बाब म्हणजे बँकेचा संदर्भदर 8 टक्क्यांपेक्षा जास्त असला तर ग्राहकाला त्यापेक्षा कमी सुरुवातीच्या दराने गृहकर्ज मिळू शकते. पण यासाठी संबंधित ग्राहक बँकेच्या इतर अटी व शर्तींना पात्र असणे आवश्यक असते.

Entertainment 

Prahaar movie review: The case against Ajmal Kasab, the terrorist who was captured alive during the Mumbai attack on 26/11 was built by public prosecutor Ujjwal Nikam, whose painstaking methods left not a shred of doubt about the former’s guilt.

Rajkummar Rao brings a dogged sincerity to his playing of Nikam, but the film never really shakes off its dominant quality — it is as by-the-numbers as it can get, in both re-creating the glimpses of that terrible night during which a terrorist group took Mumbai hostage, as well as the court-room proceedings in which defence lawyer Abbas Kazmi (Sikander Kher) works hard to dismantle the case, under the watchful eye of the judge (Ashish Vidyarthi).

Prahaar—Rajkummar-Rao.webp
news logo.jpg

Given the flood of films and serials based on 26/11 over the past years, the challenge was always going to be to give us something new. How do you make a ‘hero’ out of a workaholic who devotes all his time to his job, ignoring his family? Nikam is built for the audience as the kind of lawyer who believes in amassing every last shred of evidence duly documented in piles of sarkaari files: his righteousness is based on plodding process, not drama.

Prahaar movie review: Rajkummar Rao brings dogged sincerity to Ajmal Kasab trial

The easy option then is to create domestic conflict. Nikam’s long-suffering wife (Wamiqa Gabbi) is made the centre of a conflict between husband and son (Ritwik Sahore). While that may have been intended to a way to show that well-regarded professionals also have blind-spots, these portions also come off predictable: the thread of a workaholic father, passing on his own father’s expectations to his son, had the potential to be thorny, but is conveniently resolved.

Ironically, a film intended to showcase the fairness of the Indian legal system which holds off judgement till the case is water-tight, is made interesting by its depiction of the bad guy. Lalit Prabhakar’s Kasab gives us a believable villain through a range of emotions — from sly cruelty to straight-up lying and evasion during his trial, to the growing awareness of his crime as he waits in his cell. The creation of a ‘jihadi’ coming from a place of ignorance — ‘yahaan bhi Eid manaate hain kya,’ he asks his prison guard — is a nice, if familiar touch.

The exchanges between Nikam and Pakistani legal eagle Zulfikar (Jaideep Ahlawat) gives the film a chance to add sorely-needed nuance, and we see that at play in a smartly-written sequence, in which both men show mutual respect while coming to an accommodation over a feast. Refusing to take refuge in jingoism is also a noteworthy aspect, making the carnage a crime against humanity, not just reducing it to a religious divide.

The performances are all solid, with Ahlawat leaving a mark — no surprises there — even in a walk-on part. Good to see Ashish Vidyarthi properly back in the saddle, in a rounded role: he presides over his court with precision and empathy, making sure that, in the end, justice is done.

Overall, though, the film remains worthy, but stodgy.

IMG_7432.JPG

Sports News

Sunil-Gavaskar.jpg

Sunil Gavaskar : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील टी20 सीरीज बरोबरीत सुटली. पण या मालिकेने भारतीय गोलंदाजीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारताची सुमार दर्जाची गोलंदाजी या मालिकेने उघड केली.

Sunil Gavaskar On Team India Bowling : भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये पाच टी20 सामन्यांची सीरीज झाली. या मालिकेत भारतीय गोलंदाज काही खास करु शकले नाहीत. सीरीजच्या निकालानंतर भारतीय टीमच्या गोलंदाजीवर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्लेइंग 11 मध्ये आठ फलंदाज खेळवण्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केलाय. जास्त फलंदाज खेळवण्याच्या नादात गोलंदाज कमी होत असल्याने गोलंदाजी कमकुवत होत चालली आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने संपूर्ण सीरीजमध्ये तीनवेळा 200 पेक्षा जास्त धावांचा आकडा पार केला. दोन सामन्यात 240 पेक्षा जास्त धावा केल्या.

सीरीजच्या बहुतांश सामन्यात टीम मॅनेजमेंटने तीन स्पेशलिस्ट गोलंदाजांना मैदानावर उतरवलं. चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने 247 धावा केल्या. त्यावेळी भारताकडे मयंक यादव, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादवच्या रुपात तीन स्पेशलिस्ट गोलंदाज होते. अन्य गोलंदाजांचा कोटा भरण्यासाठी ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि नमन धीरवर टीम अवलंबून होती. टीमला याची मोठी किंमत चुकवावी लागली.

गावस्कर यांनी कुठल्याही परिस्थितीत चार स्पेशलिस्ट गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा सल्ला दिला. “भारताने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कमीत कमी चार स्पेशलिस्ट गोलंदाज खेळवावेत. पाचवा आणि सहावा पर्याय ऑलराऊंडर असला पाहिजे. जो फलंदाजी सुद्धा करु शकतो. अक्षर पटेल, नमन धीर यांची उदाहरणं दिली. मला असं वाटतं की अनेकदा आपण हार्दिक पंड्याचा पर्याय शोधण्याच्या नादात भरकटतो. हार्दिकची जागा कोणी घेऊ शकत नाही. जर, तुम्हाला त्या कॅलिबरचा ऑलराऊंडर सापडत नसेल तर उपयोगी पडेल असा खेळाडू खेळवा. नमन धीर ते काम करतोय” असं गावस्कर म्हणाले.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

सीरीजच्या अखेरच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजीवर मोठ स्टेटमेंट केलं. “दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली असती तर निकाल वेगळा असता. त्यांची फलंदाजी कौतुकास्पद होती. शाई होपने संपूर्ण सीरीजमध्ये शानदार फलंदाजी केली”

Sunil Gavaskar : ‘हार्दिकची जागा कोणी घेऊ शकत नाही’, भारतीय गोलंदाजीवर भडकलेल्या सुनील गावस्करांनी दिला एक चांगला सल्ला
news logo.jpg
Yellow Sport Sunglasses
महाराष्ट्र का तेज़ी से बढ़ता न्यूज़ प्लेटफॉर्म.png

Latest THE AK TAK Podcast Episodes

THE AK TALK PODCAST Future - Anna Hajare

Hosted by Akash Kumbhar

The AK Talk Podcast – Your Story, Our Platform

Every Voice Deserves to Be Heard

Why Join The AK Talk?

 
The AK Talk is a Marathi and Hindi podcast platform that brings together inspiring people, powerful stories, fresh perspectives, and meaningful conversations.
We are open to everyone with a story, an idea, an achievement, or a message worth sharing. From politics and business to entertainment, social work, and emerging brands, we welcome diverse voices to our platform.
Our Podcast Is Open For:

  • Politics & Public Leadership – Politicians, public representatives, political analysts, and policy experts.

  • Business & Entrepreneurship – Entrepreneurs, startup founders, CEOs, industry leaders, and professionals.

  • Artists & Entertainment – Actors, singers, filmmakers, influencers, writers, and creative personalities.

  • Brands & Companies – Business brands, startups, marketing campaigns, and industry innovators.

  • Social Workers & Changemakers – NGO founders, activists, community leaders, and people creating social impact.

  • Inspiring Personalities – Individuals with unique journeys, extraordinary achievements, and powerful life experiences.



     

 

  • Share your story with a wider audience.

  • Express your ideas and perspectives.

  • Promote your work, mission, or brand.

  • Participate in meaningful Marathi and Hindi conversations.

  • Connect with audiences through podcast episodes and social media reels.



     


Do you have a story to tell, a message to share, or a brand to showcase?
The AK Talk welcomes diverse voices and meaningful conversations.
Get in touch with our team to discuss your podcast appearance or brand collaboration.

Contact: 8421378090
The AK Talk – Every Story Matters. Every Voice Counts.

ChatGPT Image Aug 16, 2026, 01_52_51 PM.png
ChatGPT Image Sep 12, 2026, 02_23_46 AM.jpg
THE AK TALK PODCAST Future - Vidyanand Bapat

Hosted by Akash Kumbhar

Be Our Next Guest

Location

Visit us

Head Office - Pune

Mumbai and Pune

8421378090

akashkumbhar8@gmail.com

akash@theaktalk.com

Mon - Fri 9:00 am – 5:00 pm
Saturday 9:00 am – 2:00 pm
​Sunday 9:00 am – 2:00 pm

Stay Updated on Maharashtra

Subscribe to our newsletter for the latest news, politics, and culture from Pune and beyond. Join our community of readers.

bottom of page